जनतेज न्युज

चंद्रकांत दादा सत्तेच्या काळात गोट्या खेळत होते काय ? ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापुरात शिक्षक आणि पदवीधर उमेदवाराच्या प्रचारार्थ मेळावा संपन्न…
प्रतिनिधी , कोलापूर : पुणे पदवीधर मतदार संघाचे प्रतिनिधित्व केलेले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पदवीधर मतदार संघाचे नेतृत्व करताना.. त्यांनी पदवीधरांचे एकही काम केले नाही..पदवीधरांचे महामंडळ करू.. असे आश्वासन देणारे चंद्रकांत पाटील सतेच्या काळात गोट्या खेळत होते काय…अशी बोचरी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केलीय… आज कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या शिक्षक आणि पदवीधर उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
महाविकास आघाडीचे पुणे पदवीधर उमेदवार अरुण लाड आणि शिक्षक उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ आज कोल्हापूरातील महासैनिक दरबार येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते… यावेळी नामदार जयंत पाटील म्हणाले की,दोन टर्म या मतदारसंघाचे नेतृत्व केलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात जशी मतदारांची निराशा केली..तशी पुण्यात ही केली आहे…चंद्रकांत दादा जिथे जातील तिथे विरोधी पक्षांला फायदाच होतो.. कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणून.., राज्य सरकारचे हात बळकट करूया…असे आवाहन त्यांनी केले.. यावेळी बोलताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले की, भाजपवाले रेटून खोटे बोलून आपलं दुकान चालवत आहेत.. दोन्ही उमेदवारांना विजयी करून, भाजपला त्यांची जागा दाखवूया… ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले… गेली बारा वर्षे चंद्रकांत पाटील यांना संधी दिली… मात्र, त्यांनी पदवीधरांचे एकही काम केले नाही.. पदवीधरांचे महामंडळ करू.. असे आश्वासन देणारे चंद्रकांत पाटील सतेच्या काळात गोट्या खेळत होते काय.. असा सवाल मुश्रीफ यांनी चंद्रकांत दादा यांना केलाय.. या मेळाव्याला गृहराज्यमंत्री सतेज पाटील, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, खासदार संजय मंडलिक, धैयशील माने, आमदार पी.एन पाटील,राजेश पाटील,ऋतुराज पाटील, चंद्रकांत जाधव, प्रकाश आबीटकर,राजू आवळे, महापौर निलोफर आजरेकर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.