जनतेज न्युज

शाळा सुरू करण्याचा निर्णय योग्य नाही शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे ,अमरावती जिल्ह्यात आढळले 22 कोरणा पॉझिटिव्ह शिक्षक

प्रतिनिधी , अमरावती : राज्यात 23 नोव्हेंबरला शाळा सुरू होत असून मुंबई ठाण्याच्या शाळा 1 डिसेंबरला सुरू होत आहे मात्र हा निर्णय चुकीचा आहे मुंबई-ठाण्यातील विद्यार्थी हे विद्यार्थी आहेत मग विदर्भातील विद्यार्थी विद्यार्थी नाहीत का शासनाने राज्यभरात एकच निर्णय घ्यायला पाहिजे अशी प्रतिक्रिया अमरावती विभागाचे महा विकास आघाडीचे शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी व्यक्त केली, अमरावतीमध्ये सुद्धा 22 शिक्षक करून पॉझिटिव आढळल्याने सरकारने शाळा उघडण्याचा निर्णय घेऊ नये व राज्यभरात एकच निर्णय घ्यावा असे त्यांनी यावेळी सांगितले