प्रतिनिधी , शाळा सुरू करण्याचा निर्णय जेव्हा घेतला तेव्हा कोरोनाची परिस्थिती वेगळी होती,मात्र आता परिस्थिती बदलल्याने शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर मी मंत्री वर्षा गायकवाड व मुख्यमंत्री यांच्या सोबत बोलणार,मि स्वतः जिल्ह्याचा पालकमंत्री असल्याने अकोला जिल्ह्याच्या प्रशासना सोबत बोलून कोरोनाची परिस्थिती पाहून शाळेची सुरुवात लांबणीवर टाकण्याचा निर्णय आम्ही घेत असल्याचे अकोला जिल्ह्याचे पालक मंत्री व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अमरावतीमध्ये सांगितले
