जनतेज न्युज

चणे फुटाणे विकणाऱ्या चा मुलगा होतोय डॉक्टर

प्रतिनिधि ,नांदेड : नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील आदिवासी भागातील रस्त्यावर फुटाणे विकणारा रामप्रसाद जुनघरे नीट परीक्षेत 625 मार्क घेऊन बनतोय डॉक्टर…विपरीत परिस्थितीत आणि कठोर मेहनत बिकट परिस्थितीवर मात करत रामप्रसादने हे मोठं यश संपादन केल आहे ..नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील चौकात चणे फुटाणे विकून रामाप्रसाद चे वडील फ़क़ीरराव आपल्या कुटुंबा चा उदरनिर्वाह करतात. रामप्रसाद जुनघरे या विद्यार्थिया ने आपल्या घरची परस्थिति बिकट असल्याने वडिलांना मदत करत रात्रीचे दिवस करत अभ्यास करून नीट परीक्षेत 625 मार्क घेऊन आपला परिवाराचे त्याने नाव रोशन केलं आहे…रामप्रसाद जुनघरेला मोठा डॉक्टर होऊन लोकांची सेवा करण्याची, तसेच आल्यासारख्या गरीब व आर्थिक हलाखी च्या परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या मुलांची मदत करणार असल्याचे रामप्रसाद सांगितले. त्यामुळे कठीण परिस्थितीतून उज्वल यश संपादन करणाऱ्या व एम. बी. बी.एस साठी पात्र ठरलेल्या रामप्रसाद जुनघरे चे जिल्ह्याभरातून कौतुक होत आहे. अशा हया असामान्य कृतुत्व करून आदर्श निर्माण करणाऱ्या विद्यार्थ्यांस नांदेड ट्रॉफिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आर्थिक मदत करून सत्कार केलाय.