प्रतिनिधी , जळगाव : चोपडा येथील प्रणित नितीन पाटील इयत्ता सातवीत शिकणारा बारा वर्षाच्या या बालकाला राष्ट्रपती बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला राज्यपाल कार्यालयातून या कुटुंबाला माहिती देण्यात आली आहे घरात आलेल्या चोरट्यांशी झटापटी करून झुंज दिल्याबद्दल त्याला राष्ट्रपती बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे
गेल्यावर्षी नितीन पाटील यांच्या ओम साई अपार्टमेंट मधील घरात ते घरी नसताना दुपारच्या सुमारास चोरट्यांनी लुटमार करण्याच्या उद्देशाने घरात प्रवेश करून प्रणित च्या आई वैशाली पाटील यांच्या तोंडावर मिरची स्प्रे मारला. बारा वर्षाच्या प्रणित यांनी चोरट्याचे पाय घट्ट पकडून ठेवल्याने त्याना पडता येत नव्हतं आवाज देऊन आजूबाजूच्या लोकांना बोलावून त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. प्रणितच्या हिम्मती मुळे वैशाली पाटील यांच्या प्राण वाचला आणि घरात दरोडा पडण्यापासून बचावले. प्रणित पाटील या बालकाला भविष्यात डेटा सायंटिस्ट बनायचे आहे देशाची सेवा करून आई-वडिलांना अभिमान वाटेल असे महान कार्य करण्याची इच्छा प्रकट केली.
