प्रतिनिधी , सांगली : राजकीय नेतृत्व हे समाजाला दिशा देणारे आहे.. याचा विचार करून मुख्यमंत्री यांनी शिवजयंती बाबत निर्णय करायला हवा.. निर्णय घेतला तर याचा विपरीत परिणाम येणाऱ्या पिढीवर होतो… असे वक्तव्य माजी मंत्री विनोद तावडे यांनी केले.ते सांगली मध्ये बोलत होते.
शिव जयंती साजरी करणे म्हणजे सामान्य माणसाचे भावनिक स्तंभ आहे.शासनाला काळजी घेणे गरजेचे आहे. पण मंदिर वगैरे सर्व चालू केले आहे… नियमात शिव जयंती साजरी करण्यात येईल असे सांगितले आहे.. त्यामुळे शासनाने विचार करावा आमचे ते दैवत आहे.
जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर पुरुषत्व नाही अशी टीका केली होती. यावर तावडे यांनी जयंत पाटील यांच्या वर टीका केली आहे.. पॉलिटिकल टीका एका विशेष पातळीवर झाली पाहिजे.एकदा आधार नसला की अशी टीका केली जाते.
