प्रतिनिधी , पुणे : हवामानविभाग, म्हणजेच शिमला ऑफिस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाजीनगर येथील कार्यालयाला सुरक्षा रक्षक पुरवणारी कंपनी थंडर फार्स या कंपनी ने दलित कामगार विशाल खिलारे, आणी शशिकांत देसाई यांना जातीच्या कारणावरून कामावरून कमी केले
असाच एक प्रकार मेधा खोले या हवामान विभागात कार्यरत असणाऱ्या अधिकारी यांनी जातीच्या कारणावरून मोलकरीनीचा छळ केला होता , तर आज ही भारत सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या या कार्यालयात जाती वरून अनेक कर्मचाऱ्यांना कमी दर्जाची वागणूक मुळते.
हवामान विभाग शिवाजीनगर च्या कार्यालय साठी गेले 4 वर्ष काम करणाऱ्या दोन दलित कर्मचाऱ्यांना सुरक्षा रक्षक कंपनी कडून काढून टाकण्यात आले असून या तरुण कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा म्हणून दलित पँथर आणी अखिल महाराष्ट्र राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन कडून शिमला ऑफिस च्या बाहेर आंदोलने सुरू आहेत
