प्रतिनिधी , जळगाव : चोपडाः जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील एप्रिल ते डिसेंबर 2020 मध्ये मुदत संपणाऱ्या 52 ग्रामपंचायतींच्या निवडणूक नामनिर्देशनपत्र भरण्यास आजपासून प्रारंभ झाले यासाठी 28 निवडणूक निर्णय अधिकारी व 28 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारींची नेमणूक करण्यात आली आहे.नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी व लागणाऱ्या दाखले काढण्यासाठी तहसील कार्यालयात नागरिकांची गर्दी दिसत होती.
