प्रतिनिधी , सांगली : मिरज कृष्णा घाट येथे आज मगरीचे दर्शन झाले आहे. घाटावर सकाळी पोहण्यासाठी मोठी गर्दी असते आज पोहत असताना तरुणांना मगरीचे दर्शन झाले त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही मगर सुमारे 10 फुटाची असून अर्जुनवाड काठाकडून ते मिरज कृष्णा घाट कडे आली आणि परत ही कुरणे मळा भागाकडे जाऊन दिसेनासी झाली आज मगरीचे दर्शन झाल्याने पोहायला व धुनी धुण्यास आलेल्या महिला भयभीत झाले होते,सदर मगरीला वन विभागाने पकडावे अशी मागणी मलिकार्जुन दुधणी या शेतकऱ्याने केली आहे.
