जनतेज न्युज

चोपड्यात ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थित आढावा बैठक बैठकीत नागरिकांचा नगरपालिकेच्या कामकाजावर नाराजी.

प्रतिनिधी , जळगाव : चोपडा तालुक्यातील सर्व शासकीय विभाग प्रमुखासोबत विकास कामां संदर्भात जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत सर्व विभागातील कामकाजासंदर्भात आढावा घेण्यात आली त्याच बरोबर ज्या विभागा संदर्भात नागरिकांना तक्रारी अथवा समस्या आहे त्यांना याबाबत विचार ना केले जात होती या आढावा बैठकीत महावितरण विभागा संदर्भात काही नागरिकांनी अडचणी तक्रारी मांडल्या तर आडावद पोलीस वसाहत मध्ये नळकनेक्शन नसल्याची समस्या बैठकी आडावद पोलीस स्टेशनचे एपीआय किरण दांडगे यांनी मांडली परंतु चोपडा नगरपालिकेच्या कामकाजासंदर्भात व अधिकाऱ्यांच्या उत्तरा संदर्भात या बैठकीत मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त करण्यात आली तसेच पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी काही प्रस्तावास संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना या बैठकीतच भ्रमणध्वनीवरून विचारणा करून ते काम मार्गी लावण्यासाठी सांगितले तात्काळ या बैठकीत निर्णय होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केला या बैठकीला आमदार लताताई सोनवणे माजी आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे प्रांत अधिकारी सीमा अहिरे तहसीलदार अनिल गावित गट विकास अधिकारी भरत को सो दे यांच्यासह तालुक्यातील सर्व शासकीय विभाग प्रमुख तसेच नागरिक व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.