जनतेज न्युज

तालुका पोलिसांनी मोटरसायकल चोरांच्या मुसक्या आवळत 16 मोटरसायकल केल्या हस्तगत….

प्रतिनिधी ,येवला: येवला तालुका पोलिसांनी मोटरसायकल चोरी करणाऱ्या चौघा मोटरसायकल चोरांना कोळपेवाडी तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर येथून दोन व चांदवड तालुक्यातील बडाने येथून दोन आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.
तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्यासह सहाय्यक निरीक्षक उज्वलसिंह राजपूत, एकनाथ भिसे यांच्यासह पोलीस शिपाई आबा पिसाळ, मुकेश निकम, सतीश मोरे, गणेश सोनवणे, संदीप सांगळे आदींनी दहा ते पंधरा दिवस दिवस-रात्र तपास करून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे 2 आरोपींना कोळपेवाडी तालुका कोपरगाव तसेच दोघा आरोपींना चांदवड तालुक्यातील भडाने येथून ताब्यात घेतले यावेळी त्यांच्या ताब्यातील येवला शहर व तालुका पोलिस स्टेशन हद्दीतील तसेच मनमाड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चोरी गेलेल्या एकूण सोळा मोटरसायकलचा ताब्यात करण्यात आले आहे. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल नागरिकांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले आहे.