प्रतिनिधी, हिंगोली : मुंबईतील आझाद मैदानावर छत्रपती संभाजीराजे यांचे मराठा समाज आरक्षण व विविध मागण्यासंदर्भात 26 फेब्रुवारी पासून उपोषण सुरू आहे. छत्रपती संभाजी राजे यांच्या उपोषणाचा सरकारने गांभीर्याने विचार करून मराठा समाजाच्या मागण्या तात्काळ मान्य नाही केल्या तर येत्या दोन मार्च रोजी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. यासंदर्भात आज सकल मराठा समाज हिंगोली जिल्ह्याच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
