विनोद वीराची राज्याला गरज होती, संजय राऊत यांच्या वर सदाभाऊ खोत यांची टीका.
प्रतिनिधी , जळगाव : केंद्राच्या टॅक्समधून प्रत्येक राज्यांना निम्मी रक्कम जीएसटी च्या स्वरुपात परत मिळत असते, जो टॅक्स केंद्र परत देतो वजा करावा आणि यांनी डिझेल पेट्रोल कमी रेट मध्ये द्यावं, या सरकारला काही काम नाही विनोद वीर संजय राऊत आहेत सध्या सर्कशी बनले आहेत, एका विनोद वीराची राज्याला गरज होती ते दररोज विनोद करत बसतात, त्यांना राजाचं काही पडले नाही आठवण झाली की खांद्यावर सिलेंडर घ्यायचं हातात केंड घ्यायचं मोर्चा काढायचा, नाहीतर सायकलवर बसायचं रस्त्याने पळत सुटायचं सायकल एक कोटीच्या गाडीत बसायचं घरला जायचं, खऱ्या अर्थाने राज्य सरकार मधल्या मंत्र्यांनी हा खेळ बंद करावा,कोरोनाच्या काळात महाराष्ट्रात काय घडलं आहे, तिकडे पाहण्याची गरज आहे अशी टीका आ. सदाभाऊ खोत यांनी जळगाव येथील पत्रकार परिषदेत महा विकास आघाडीच्या सरकार वर केली आहे.
