प्रतिनिधी , वर्धा – गेल्या दोन दिवसांपासून वर्धा शहरासह हिंगणी तालुक्यात सुरु असलेल्या दमदार पावसामुळे नाल्याच्या पुराने शेतात थैमान घातल्याने तीन एकर शेतातील अंकुरलेले पीके उद्धस्त झाले आहे.
दीड एकर शेत जमीन खरडून गेल्याने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हिंगणी येथील शेतकरी विजय टेकाटे यांच्या शेतातील अंकुरलेले पिक नाल्याच्या पुरामुळे खराब झाले…पावसामुळे नाल्याच्या पुराचे पाणी शेतात घुसल्याने या नाल्याकाठच्या शेतजमीन खरडून गेली आहे. सुपीक जमीनीचा थर वाहून गेला आहे. खरडून गेलेल्या शेतात सध्या चिखल साचला असून शेतात कोणतेही काम करता येत नाही. सरकारने काही आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी विजय टेकाटे यांनी केली आहे…
