प्रतिनिधी , यवतमाळ : घरकुलाच्या प्रपत्र ड यादीतून पात्र लाभार्थ्यांना वगळण्यात आले. त्यामुळे यवतमाळ तालुक्यातील सरपंच आणि लाभार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या डीआरडीए कार्यालयात धडक दिली. अधिकाऱ्यांना जाब विचारला. मात्र, समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळेकार्यालयात संगणक, तावदाने फोडले. कागदपत्र फेकून प्रकल्प संचालकांची खुर्ची कार्यालयाबाहेर काढली.
घरकुल यादीत तफावत असल्याचा आरोप करीत सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि वंचित लाभार्थ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढला होता.
