जनतेज न्युज

जादूटोणा करून पैशाचा पाऊस पडण्याच्या बेतात असलेल्या एका कासवासह सहा जण पोलिसांच्या ताब्यात…..

प्रतिनिधी , मालेगाव: जादूटोणा करून पैशाचा पाऊस पडण्याच्या बेतात असलेल्या एक कासव आणि सहा जणांना मालेगाव पोलिसांनी अटक केली आहे.मालेगाव पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मेडशी येथे सहा जण एक कासव घेऊन असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकून त्यांना अटक केली. दरम्यान हे प्रकरण वन्यजीव कासवाशी संबंधित असल्यामुळे मालेगाव पोलिसांनी वनविभ कार्यालयाकडे सुपूर्द केले असून,यामधील संतोष गोरे,संतोष सिल्लोडे, दगडू डोंगरदिवे, लहू खरात,श्रीराम काकडे,निवृत्ती काळे या सहा जणांविरुद्ध वन्यजीव कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले असून,पुढील कारवाई वनविभाग करीत आहे.