जनतेज न्युज

देवेंद्रजी मुंबई मेट्रो – ३ मध्ये तुम्हाला प्रवास व फोटो काढून ट्वीट करण्याची लवकरच संधी मिळेल – महेश तपासे

प्रतिनिधी , मुंबई दि. २८ जानेवारी – मुंबई मेट्रो – ३ हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकार पूर्ण करेल यात शंका नाही परंतु केंद्राकडून वारंवार अडथळा निर्माण केला जात आहे अशी मुंबईकरांची भावना आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना फोटो काढून ट्वीट करण्याची व फिरण्याची संधी मिळावी ही मुंबईकरांची अपेक्षा आहे असा टोला राष्ट्रवादीचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या मेट्रोत बसून ट्वीट करत मुंबई मेट्रोतून कधी प्रवास करता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली होती त्याचा समाचार महेश तपासे यांनी घेतला आहे.
महाविकास आघाडी सरकार मुंबई मेट्रो – ३ लवकरच सुरू करेल आणि ती पूर्ण करण्यासाठी कटिबद्धही आहे. परंतु वारंवार केंद्राकडून मदतीऐवजी आडकाठी होत आहे. त्यामुळे केंद्रासोबत आपण समन्वय केलात तर प्रकल्प लवकर पूर्ण होवू शकेल आणि मुंबईकरांना दिलासा मिळू शकेल असेही शेवटी महेश तपासे म्हणाले.