आधी वीजबिल निश्चिती करा,नंतर सवलत द्या:दरेकर
कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येवरून दरेकर यांचा राज्य सरकारला टोला,सरकारमध्ये सुसंवाद नाही.ग्रामीण भागात शाळा उघडण्यावरूनही सरकारला टोला
प्रतिनिधी , जालना : रेल्वे सुरु करण्यासाठी केंद्राने मान्यता देण्याचे सूतोवाच केले आहे.याबाबत केंद्राने राज्याला कळवलं आहे., पण रेल्वे सुरु करण्यासाठी राज्याला केंद्राकडे मान्यता मागावी लागते,केंद्र सरकार ती द्यायला देखील तयार आहे.पण राज्य तशा प्रकारची भूमिका घेत नाही,असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला मारला आहे.आज दरेकर जालन्यातील परतुरमध्ये पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत दरेकर यांनी रेल्वे उशिरा सुरु होण्यावरून राज्य सरकारला धारेवर धरलं.
विज बिल भरण्यासाठी राज्य सरकारने 50 टक्के सवलत द्यायला तयार आहे ही राज्य सरकारची क्लुप्ती आहे.पण उर्वरीत 50 टक्के रक्कम भरायला वीज ग्राहकाकडे पैसा नाही असं सांगत आधी वीज बिल निश्चिती करण्याची मागणी करत नंतर सवलती द्या असंही दरेकर यांनी म्हटलंय.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढायला सुरुवात झालीय.राज्य सरकारमध्ये सुसंवाद नाही.त्यामुळे कोरोनाबाबत पहिल्या दिवसांपासून सरकारचं धोरण चुकत असल्याचा आरोप दरेकर यांनी केला.शाळा सुरु करण्याबाबत देखील सरकारमध्ये एकवाक्यता नसल्याचा आरोप करत ज्या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा त्या शहरी भागात सरकार शाळा सुरु करायला तयार नाही तर जिथे आरोग्याच्या सुविधा नाही तिथे सरकार शाळा उघडत असल्याचा आरोप दरेकर यांनी सरकार घरात बसल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
