जनतेज न्युज

जालना जिल्ह्यात ग्रामपंचायत प्रचाराला सुरुवात गावागावात निघत आहेत प्रचार रॅली.

प्रतिनिधी , जालना : जालना जिल्ह्यात येत्या पंधरा तारखेला जिल्ह्यात 475 ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पार पडत आहेत त्याच पार्श्वभूमीवर गाव पुढारी आपल्या वर्चस्वाची लढाई टिकून ठेवण्यासाठी गावागावात गल्ली बोळ पिंजून काढत आहेत.

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील ग्रामपंचायत ही यापूर्वी भाजपकडे होते भाजप सरपंच काळात पाहिजे तसा विकास झाला नसल्याचा आरोप गावकऱ्यांचा होत आहे.

पिंपळगाव रेणुकाई येथे यापूर्वी भाजपची ग्रामपंचायत होती व या भाजपच्या ग्रामपंचायतीच्या सत्तेच्या वेळस नळ कनेक्शन असेल, कोणता विकासाचा मुद्दा असेल तो या तात्कालीन सरपंचांनी पाहिजे तसा केला नाही व जलयुक्त शिवार योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार या सरपंचांनी केलेला आहे.

उमेदवार गल्लीबोळात , मतदारांच्या घरी जावून प्रचार करीत आहेत . शिवाय उमेदवाराच्या कुटुंबातील सदस्यांसह समर्थकांनीही प्रचाराची यंत्रणा जोरदार राबविण्यास सुरूवात केली आहे . महिला उमेदवारही प्रचारात मागे नाहीत . सत्ताधारी केलेल्या कामाचे तर विरोधक गावातील समस्या मांडून विकास कामांचा आराखडा मतदारांसमोर मांडत आहेत.दरम्यान , उमेदवार धावपळ करीत असले तरी मतदार कोणाच्या पारड्यात मत टाकतात हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे .