प्रतिनिधी , मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. फडणवीस यांच्या ताफ्यात असलेली बुलेटप्रुफ गाडीसुद्धा काढून घेतली जाणार असून राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. फडणवीस यांच्याबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेतही सरकारकडून कपात करण्यात आली आहे.यावर मंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावर बोलताना, ‘सुरक्षा काढण्याची परंपरा पहिली भारतीय जनता पार्टीने या महाराष्ट्राला शिकवली आहे.आपण जर देशामधलं राजकारण पाहिलं तर सोनिया गांधींपासून ते राहुल गांधींपर्यंत आणि विरोधीपक्षांच्या नेत्यांपर्यंत काहीही घडलं की सुरक्षा भाजप काढतं.परंतु,त्यांची पूर्ण सुरक्षा काढलेली नाही फक्त सुरक्षा कपात केलेली आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.
