प्रतिनिधी , दीपाली चव्हाण यांनी काही दिवसाच्या आधी माझ्या घरी येऊन आमदार रवी राणा व मला दोघांनाही शिवकुमार यांच्याबाबत अनेक तक्रारी सांगितल्या होत्या, त्या दरम्यान आमदार रवी राणा यांनी वनमंत्री यांच्यासोबत दूरध्वनीद्वारे या सर्व प्रकरणाची माहिती दिली होती, व दीपाली चव्हाण यांची तिथून बदली करून द्यावी अशी मागणी केली होती, मात्र वनमंत्र्यांनी तेव्हा हो ला हो लावून टाळाटाळ केली मी तिला न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला होता मात्र आम्ही कुठेतरी कमी पडलो. त्यानंतरही मात्र आता दिपाली चव्हाण यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या शिवकुमार जेवढे जबाबदार आहेत तेवढे वनक्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी सुद्धा जबाबदार आहे त्यामुळे दोघांवरही तीनशे दोनशे गुन्हे दाखल करावे अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली
