प्रतिनिधी , अहमदनगर : मोदी सरकारच्या विरोधात कॉग्रसने संगमनेरमधे लक्षणीक धरणे आंदोलने केले आहे.वाढती महागाई ,सरकारी कंपन्यांच्या खाजगीकरण, वाढते तेलाचे दर, देशाचा बळीराजा, विरोधात कृषी विरोधी कायदे ,लोकांचे गेलेले रोजगार ,दिवसेंदिवस वाढते पेट्रोल डिझेलचे दर ,अशा अनेक मागण्यासाठी आज संगमनेरमधे एक दिवसीय लक्षणे धरणे आंदोलने करण्यात आले.अहमदनगर जिल्ह्यात कॉंग्रेस पक्षाच्या तर्फे महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात तहसीलदार व प्रांताधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाच्यावतीने लक्षणीक धरणे आंदोलनाचे आयोजन केले होते.
