जनतेज न्युज

जोगळेकर प्लॉट मधील पाण्याची टाकी ओवरफ्लो;लाखो लिटर पिण्याच्या पाण्याची नासाडी

प्रतिनिधी, अकोला : अकोला शहरातील जोगळेकर प्लॉट परिसरात असलेली पिण्याच्या पाण्याची टाकी ओवरफ्लो झाल्याने लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया गेले आहे. रात्री जलप्रदाय विभागाने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी टाकी मध्ये पाणी सोडले आले होते.  रात्रभर टाकीमध्ये पाणी भरत राहिले. दरम्यान टाकी भरल्यानंतर सकाळी टाकीतून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे परिसरातील नागरिकांना दिसले. नागरिकांनी याची माहिती महापालिका मधील जलप्रदाय विभागाला दिली. मात्र तोपर्यंत लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली होती. महापालिकेच्या गलथान कारभारामुळे ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत लाखो लिटर पाणी वाया गेल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.