प्रतिनिधी, सोलापूर : बार्शी तालुक्यातील जामगाव(पा) येथे अवैध दारूविक्री सर्रास होत असल्याने ग्रामपंचायतीने आक्रमक पवित्रा घेतला. ग्रामसभेत दारूविक्री बंदीचा ठराव मंजूर करून घेण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत गावातील दारू बंद करायची असा ठरावच त्यांनी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत मंजूर करण्यात आला, वैराग पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत निवेदन दिले.गावात दारूविक्री सर्रास केली जात असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला. दारुमुळे जामगाव (पा )येथील मागच्या काळात एकूण दहा ते पंधरा व्यक्ती दारूमुळे मरण पावले तसेच अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. तसेच अजूनही गावातील वीस ते पंचवीस तरूण दारूच्या व्यसनात आहारी गेले आहेत. जर गावातील दारूबंदी झाली नाही तर यापेक्षा भयानक परिस्थिती निर्माण होईल, म्हणून गावातील सर्व अवैध्य दारू विक्री बंद झाली पाहिजे .अशी मागणी करत ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायतीने गावात दारुबंदी केली आहे, तसेच दारूबंदी केल्याच्या ठरावाची प्रत वैराग्य पोलीस स्टेशन, जिल्हाधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनाला देखील पाठवण्यात आलेली आहे.
