जनतेज न्युज

ठाकरे सरकार सूडाच्या भावनेतून भाजपा नेत्यांच्या सुरक्षा काढतंय – आ.राम कदम

प्रतिनिधि , मुंबई : ठाकरे सरकारने नुकताच राज्यातील बड्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड या नेत्यांच्या नावाचा समावेश आहे.

यावरच आमदार राम कदम यांनी, ‘ठाकरे सरकार सूडाच्या भावनेतून बड्या नेत्यांची सुरक्षा कमी करतंय’,अशी प्रतिक्रिया दिली आहे.

याचसोबत त्यांनी, जबाबदार पोलीस अधिकारी स्वतः सांगतायेत,ही सुरक्षा काढणं,कमी करणं योग्य नाही,तरीदेखील आवाज दाबायचाय म्हणून हे सरकार दुसाहस करत आहे’, असा टोलाही आमदार राम कदम यांनी ठाकरे सरकारला लगावला.