प्रतिनिधी , मुंबई : नवी मुंबई मनपा निवडणुकांपूर्वी फोडाफोडीचं राजकारण सुरू झालय. भाजपाचे अनेक नगरसेवक गणेश नाईक यांना सोडचिठ्ठी देत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतायत यामुळे भाजपा मध्ये अस्वस्थता पसरलीय. पोलिसी बळाचा वापर करून भाजप नगरसेवकांवर दबाव आणला जातोय. त्यांच्या केसेस उकरून काढत साम, दाम, दंड ,भेदचा वापर केला जातोय. त्यामुळे नवी मुंबईचं राजकीय वातावरण भयभीत व गढूळ झाल असून पोलिस प्रशासनाने पार्शल भूमिका घेऊ नये अशी मागणी विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी नवी मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेत केलीय. पोलिसांनी सरकारच्या दबावाखाली काम करू नये. नगरसेवकांवर दबाव आणून त्यांना आपल्या पक्षात घ्यायचे ही सरकारची मोडस ऑपरेंडी झालीय. जर हे थांबवलं नाही तर जशास तसं उत्तर दिलं जाईल असं प्रवीण दरेकर यांनी सांगितलंय. आज दरेकर यांनी पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांना सांगण्यात आला..
