जनतेज न्युज

ठाणे मनपा निवडणुकीत उतरणार “आप” त्यामुळे वाढणार इतर पक्ष्यांचा ताप”

प्रथिनिधी, ठाणे : नुकतीच ठाणे महानगर पालिकेची प्रभाग आरक्षण सोडत पार पडली असून आता सगळ्याच पक्षानी निवडणूकीत ची तयारी जोरात केली आहे. ठाणे महानगर पालिका निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली आणि पंजाब निवडणुकांप्रमाणेच आम आदमी पार्टी आपल्या जाहीरनाम्यात विविध घोषणा करुन ठाणे मनपा वर सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत त्यामुळे इतर पक्षांना अडचण होऊ शकते. शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असताना ठाणेकरांना नवा पर्याय देण्याकरिता जोरदार हालचाली आम आदमी पक्षाने सुरू केल्या आहेत. दिल्ली, पंजाबमध्ये घवघवीत विजय मिळाल्यानंतर ठाण्यात ‘आप’ संघटन विस्तार करुन ठाणे महापालिकेच्या सर्व जागा लढविणार आहे. ‘आप’ ने आयोजित केलेल्या पत्रकार परिषद मध्ये आप प्रतिनिधीशी संवाद साधला असता पत्रकार परिषद मध्ये ठाणे शहर अध्यक्ष राकेश आंबेकर बोलले की, आमच्या पक्षात सदस्य होण्यासाठी महिला-पुरुषांसह युवा पिढी सुध्दा संपर्क करत आहेत. येत्या ठा.म.पा निवडणुकीत व्यवस्था परिवर्तन करण्याची ईच्छा असणाऱ्या मंडळींना पक्षाची उमेदवारी देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे त्यानंतर ठाणे शहर सचिव संदेश विचारे म्हणाले की, कट्टर देशभक्ती, कट्टर मानवता, कट्टर ईमानदार या त्रिसूत्री वर आमचा पक्ष उभा आहे त्यामुळे आम्ही सुशिक्षित, स्वच्छ प्रतिमा या निकषांवर ईच्छुकांची मुलाखत घेऊन उमेदवारांची सुची आम्ही जाहीर करणार आहोत. ठाणे शहर सदस्य रॅाकी हिंदुस्थानी यांनी सांगितले की, ठाणेकरांनी एक संधी दिली तर निश्चितपणे रस्त्यांवरील खड्डे, मनपा मधील भ्रष्टाचाराचे अड्डे साफ करु तसेच म.न.पा शाळेचा दर्जा, वाहतूक कोंडी समस्येचे निवारण व ५०० चौ. फुटांपर्यंत मालमत्ता कर माफ करु, जेष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी यांना परिवाहन सेवा प्रवास विनामुल्य देणार. आपचे राष्ट्रीय सदस्य राजेश उन्नीकृष्णन म्हणाले की, दिल्लीमध्ये ज्याप्रमाणे विनामुल्य विज, पाणी, शिक्षण, आरोग्य इत्यादी सुविधा देण्यात आल्या, पंजाबच्या जनतेला 300 युनिट विज मोफत देतोय त्यामुळे महाराष्ट्रातील येणाऱ्या निवडणुकांमध्ये मनपाचा अभ्यास करून कशाप्रकारे महाराष्ट्रातील जनतेला पालिका अंतर्गत मोफत व कमी दरात सुविधा देता येतील त्याचा अभ्यास आम्ही करतोय. ठाण्यातील पाणी पट्टी, विज, शिक्षण, आरोग्य मोफत देण्यासाठी ठाणेकरांनी ‘आप’ ला एकहाती सत्ता द्यावी. भष्ट्राचार मुक्त ठाणे या संकल्पनेवर ठाणेकर आम्हांला नक्कीच प्रतिसाद देतील.