जनतेज न्युज

शिक्षण प्रसारक विद्यापीठाचे नवनियुक्त प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांचा आज सन्मान ….

प्रतिनिधी, पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नवनियुक्त प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांचा आज शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरे या संस्थेच्या वतीने पुणे महानगरपालिका उपायुक्त व पर्यावरण विभागाचे प्रमुख डॉ. रमेश शेलार आणि शिक्षण प्रसारक मंडळ व विद्या सहकारी बँकेचे विद्यमान संचालक महेशबापू ढमढेरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.  डॉ. संजीव सोनवणे यांनी नुकताच पुणे विद्यापीठाच्या प्र- कुलगुरू पदाची जबाबदारी स्वीकारली. त्यानिमित्ताने हा सन्मान संस्थेच्या वतीने करण्यात आला. 

यावेळी उच्च शिक्षणाच्या संदर्भात विविध विषयांवर मा. प्र- कुलगुरू यांच्या सोबत मा.  महेशबापू ढमढेरे व   डॉ. रमेश शेलार यांनी मनमोकळा संवाद साधला. ग्रामीण भागातील संस्थांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी विद्यापीठाच्या माध्यमातून  आपण सगळे मिळून प्रामाणिक प्रयत्न करूयात अशी ग्वाही यावेळी प्र – कुलगुरु डॉ. संजीव सोनवणे यांनी दिली.

तळेगांव ढमढेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था समाजातील सर्वच घटकांपर्यंत शिक्षणाची गंगा प्रामाणिकपणे  पोचविण्यासाठी कटिबध्द असल्याचे मा. महेशबापू ढमढेरे यांनी यावेळी प्र- कुलगुरूंना सांगितले. लवकरच तळेगांव च्या शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेस भेट देणार असल्याचे डॉ. संजीव सोनवणे यांनी सांगितले.