प्रतिनिधी , ठाणे : भाजप कार्यकर्त्यांनी उचलला आनंद दिघेच्या कामांचा वसा
येणाऱ्या ठाणे महापालिका निवडणूक भाजपचाच झेंडा फडकणार
ठाण्यात कोरोना काळात भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम केले असून सत्ताधारी शिवसेनेने फक्त दिखाव्याची भूमिका घेतली आहे. दिवंगत नेते आनंद दिघे यांनी जपलेली सामाजिक बांधिलकी शिवसेनेने संपवली आहे. दिघेच्या कामांचा वसा भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. त्यामुळे येणाऱ्या ठाणे महापालिका निवडणुकीत ठाणेकर मोठ्या संख्येने भाजपला सहकार्य करून महापलिकेवर भाजपला झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला. भाजप नगरसेवक भरत चव्हाण यांच्या पुढाकाराने सहस्तचण्डि हवनात्मक नवकुंडीय महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात दरेकर आले होते. त्यावेळी माध्यमाशी बोलताना प्रवीण दरेकर यांनी सत्ताधारी शिवसेनेवर जोरदार टीका केली.
राज्यात सत्ता स्थापन कारण्यासाठी शिवसेनेने हिंदुत्वचा झेंडा खांद्यावरून उतरवला आहे. तसेच सद्या शिवसेनेची परिस्थिती नाचता येईना अंगण वाकडे अशी झाली असून प्रत्येकवेळी राज्य सरकार म्हणून स्वतः काही करायचे नाही आणि नेहमी केंद्र सरकारकडे बोट दाखवायचे हेच उद्योग सद्या सुरू आहे. अशी टीका देखील यावेळी प्रवीण दरेकर यांनी ठाण्यात केली.
कोपरीत सुरू असणाऱ्या अश्या धार्मिक कार्यक्रमामुळे हिंदू धर्माची पताका जपण्याचे काम भाजप ठाण्यात करत आहे. ठाण्यात भाजपचे काम योग्य पद्धतीने सुरू असून कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. त्याचबरोबर आनंद दिघे याच्या ठाण्यात शिवसेना कार्यकर्ते काम करताना दिसत नाही. कोरोना काळात भाजपच्या कार्यकर्त्यांनी लोकांसाठी धावपळ करून समाजसेवा केली, धर्मवीर आनंद दिघे यांच्या सामाजिक बांधिलकी आणि दिघे यांच्या कामाचा वसा खऱ्या अर्थाने भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात उचललेला असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत असल्याचे प्रवीण दरेकर प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
राज्याचे उपमुख्यमंत्र्यांचे वक्तव्य दुर्दैवी – प्रवीण दरेकर
पोलिसांच्या मागे चोर धावत असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वक्तव्य केले होते. सरकार मध्ये असून अजित पवार असे वक्तव्य करत असल्याने हे दुर्दैव आहे. त्याचबरोबर कायदा सुव्यवस्था जोपासण्यात हे सरकार अपयशी आहे. पोलिसांना मनोबल आणि यंत्रणा वाढवली जात नाही, पोलिसांची प्रतिमा मालिन होत असून, त्याचबरोबर सरकारची प्रतिमा मालिन होत आहे अशी टीका देखील यावेळी प्रवीण दरेकर यांनी केली.
