जनतेज न्युज

भंडारा दुर्घटनेतील दोषींवर कारवाई होणार.. बच्चू कडू स्वतः पाहणी करणार

प्रतिनिधी , भंडारा येथील रुग्णालयात झालेल्या आगीच्या तांडवात १० नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. खरतर राज्यात देखील कुठेही अशाप्रकारच्या घटना घडू नयेत याकरिता दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले तर भंडारा येथील रुग्णालयाची पाहणी देखील स्वतः बच्चू कडू करणार आहेत. जी दुर्दैवी घटना घडली यात राज्य सरकार त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं असून पीडित कुटुंबाला शासन स्थरावर मदत देखील केली जाणार असल्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले