जनतेज न्युज

ठाण्यात झाली कोविड १९ लसीची रंगीत तालीम

प्रतिनिधी , ठाणे : ठाणे जिल्हा स्तरावर आज तीन ठिकाणी ड्राय रन होतेये… ठाणे सिव्हिल, शहापूर आणि दिवे अंजुर, तर महापालिका मिळून 12 ठिकाणी ड्राय रन करण्यात येत आहे… ठाणे जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 60 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल संपूर्ण प्रक्रिया सुरक्षीत आहे, सर्व तयारी झालेली आहे, आम्ही सज्ज आहोत, लसींच्या साठवणुकीसाठी वेगळी तयारी करण्यात आली आहे अशी माहिती ठाणे जिल्हाधिकारी यांनी दिलीये… तर केंद्र सरकारने कोविड १९ ही लस मोफत द्यावी या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मागणीला पाठिंबा देत ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील कोविड १९ लस सर्वांना मोफत द्यावी अशी मागणी केलीये…