जनतेज न्युज

पालकमंत्रीच्या उपस्थितीत ड्राय रनला जळगावात सुरुवात

प्रतिनिधी , जळगाव : जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नर्सिंग कॉलेजमध्ये आज सकाळी कोरोनाच्या लसीकरणाची रंगीत तालीम सुरू करण्यात आली आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या या ‘ड्राय रन’मध्ये महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद व सिव्हील सर्जन डॉ. एन.जी. चव्हाण यांनी उपस्थितांना चाचणीबाबतची माहिती दिली. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकारी मिलींद काळे यांनी सर्वप्रथम कोरोनाची लस घेतली. आज सकाळी मेडिकल कॉलेजमध्ये कोरोनाच्या लसीच्या सुरू झालेल्या ड्राय रनमध्ये काळे यांना सर्वात पहिल्यांदा लस देण्यात आली. कोविडची लस ही पूर्णपणे सुरक्षित असून कुणीही न घाबरता लस घेण्याचे आवाहन मिलींद काळे यांनी याप्रसंगी केले. तर, श्री काळे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दरम्यान, काळे यांच्यानंतर मेडिकल कॉलेजमध्ये अन्य कोरोना योध्द्यांना ही लस देण्यात आली. याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद व सिव्हील सर्जन डॉ. एन.जी. चव्हाण यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती आहे.