प्रतिनिधी, नांदेड : नांदेड शहरात स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखा नांदेड ते पक्कीचा या रस्त्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोड असे नाव होते तत्कालीन नांदेड नगरपालिका असताना या रोडला हे नाव देण्यात आले होते असा प्रस्ताव देखील नगरपालिकेत मंजूर करण्यात आला होता तेव्हापासून आज 2022 पर्यंत हे नाव कायम राहिले पण सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते असणारे बाबुभाई ठक्कर यांचं नाव देण्यात आल्यामुळे कुठेतरी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव पुसण्याचा प्रकार एक हत्ती महानगरपालिका असलेल्या काँग्रेस नगरसेवक व संबंधित अधिकाऱ्यांनी हे प्रकार केला असून त्वरित त्या ठिकाणी ते बोर्ड काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाव देण्यात यावे अन्यथा यापुढे आम्ही दोन दिवसांमध्ये ते बोर्ड काढून आम्ही तिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे नाव देऊ त्याची संपूर्ण जिम्मेदारी पोलीस प्रशासनाची व महानगरपालिका प्रशासनाची व जिल्हा प्रशासनाची राहील असा इशारा आंदोलकांनी दिला आहे यावेळी आंदोलकांनी अशोक चव्हाण यांच्या देखील निषेध केला आहे व आंदोलकाच्या वतीने प्रशासनाला विनंती देखील करण्यात आली आहे की हे बोर्ड त्वरित काढावा.
