जनतेज न्युज

तडीपार कायद्याचा नियम भंग करणाऱ्या गुंडाला सातारा शहर पोलिसांनी केली अटक

प्रतिनिधी, सातारा : सातारा शहराच्या हद्दीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून चोऱ्या हाणामाऱ्या व गंभीर गुन्हे करून शहराची शांतता भंग केल्याप्रकरणी अनेक गुंडांना तडीपार करण्यात आले होते मात्र या तडीपार कायद्याचा भंग करत सातारा शहराच्या हद्दीमध्ये बेकायदेशीररीत्या वावरणाऱ्या सुश्रुत सावंत या संशयित आरोपी वर सातारा शहर पोलिसांनी पुन्हा एकदा गुन्हा दाखल करून त्याला शिताफीने अटक केली आहे याबद्दल अधिक तपास सातारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली काय मोरे पीएसआय मोरे हे करत आहेत