जनतेज न्युज

तळेगाव च्या सत्याग्रही घाटात शिवशाही बस पलटली ; सर्व प्रवासी सुखरूप

प्रतिनिधी, वर्धा : तळेगाव शा पंत आज वर्धा जिल्ह्यातील तळेगाव च्या सत्याग्रही घाटात शिवशाही बस पलटी झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या पलटी झालेल्या बस मध्ये वीस प्रवाशी प्रवास करत होते, अमरावती वरून नागपूर च्या दिशेने जात असताना तळेगाव च्या सत्याग्रही घाटात जात असताना शिवशाही बस क्रमांक mh 06 bw 0903 च्या समोर नागपूरच्याच दिशेने जात असलेल्या ट्रक क्रमांक .mh 28 bb 3855 च्या चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने हा ट्रक मागे येऊ लागला याच ट्रकच्या मागे शिवशाही बस असल्याने आपली बस वाचविण्यासाठी बस चालकाने बस बाजूला वळविण्याचा प्रयत्न केला असता ही बस पलटी झाली असे प्रत्यक्ष दर्शी संगत होते.या शिवशाही बस मध्ये एकूण वीस प्रवाशी प्रवास करत होते पण सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. घटनास्थळी बस पलटी झाल्यानंतर पलटी झालेल्या बस ला विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने बस चे अजूनच नुकसान झाले, तर याच अपघातात एका कारला सुद्धा धडक लागल्याने त्या कारचे सुद्धा नुकसान झाले ,घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार गजानन बावणे ,शिपाई बालाजी मस्के, राहुल अमोने ,कृनाल कांबळे यांनी पोचवून परिस्थिती नियंत्रणात आणली .वाहतूक सुरळीत केली .