जनतेज न्युज

थोरात कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांना इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड

प्रतिनिधी, अहमदनगर : काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते मा. महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांना यावर्षीचा राष्ट्रीय पातळीवरील इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड जाहीर झाला आहे. जे बी घुगरकर हे अनेक दिवसापासून कारखान्याचे कार्यकारी संचालक पद अत्यंत कार्यक्षमपणे सांभाळत आहेत.  माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ, व्हा. चेअरमन संतोष हासे ,इंद्रजीत भाऊ थोरात व सर्व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने यावर्षी 15 लाख 51 हजार मे. टनाचे उच्चांकी गाळप केले या पुरस्काराविषयी कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, सभासदांना आणि ऊस उत्पादकांना दिली जाणारी सुविधा, स्वच्छता ,गुणवत्ता या सर्व बाबींचा विचार करून राष्ट्रीय पातळीवरील द शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीने दिला जाणारा उद्योग उत्कृष्टता पुरस्कार 2021- 22 हा जगन्नाथ घुगरकर यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनीही कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांचा अभिनंदन केला आहे  28 जुलै रोजी गोवा येथील शानदार कार्यक्रमात हा पुरस्कार कार्यकारी संचालक घुगरकर यांना दिला जाणार आहे.