प्रतिनिधी , हरीसाल येथे वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी गोळी जाळून आत्महत्या केल्यानंतर दोषींवर कारवाई झाली पाहिजे याकरिता संपूर्ण महाराष्ट्र् एकवटला आहे.. भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी वरिष्ठ अधिकारी यांचेवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी भूमिका घेतली आहे. दीपाली ही महिला असताना तिला मानसिक त्रास देन हे योग्य नाही.. या बाबतची तक्रार सुद्धा वरिष्ठांना दिली असताना सुद्धा वरिष्ठ महिलांच्या बाबतीत गप्प का असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केला आहे.. दरम्यान महिलांच्या सुरक्षिततेसाठी जो कायदा आहे त्याचा उपयोग होत नसेल तर हा कायदा बंद करावा अशी टीका करून चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेवर निशाणा साधला आहे..
