स्फोटकांनी भरलेल्या हिरव्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणात माफीचा साक्षीदार होणार आहेत अशी चर्चा असलेले मुंबई क्राईम ब्रान्च अधिकारी रियाजुद्दीन काजी यांची यासंबंधी एन आय एन ए तब्बल पाच दिवस रोज सलग दहा तास चौकशी केली
प्रतिनिधी , मुंबई : स्फोटकांनी भरलेल्या हिरव्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडी संदर्भात अनेक पुरावे नष्ट करण्याचे काम सचिन वाजे आणि टीम ने केले होते याच संदर्भात सचिन वाजे याचे खासमखास मुंबई क्राइम ब्रांचचे पोलीस उपनिरीक्षक रियाजुद्दीन काजी यांचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय 25 फेब्रुवारीला दक्षिण मुंबईतील कार मायकल रोडवर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती यासंदर्भातील पुरावे नष्ट करण्याकरता रियाजुद्दीन काजी मुंबईतील विक्रोळी कन्नमवार नगर येथे असलेल्या बंटी नावाच्या एका गॅरेज मध्ये गेले होते त्या ठिकाणी असलेला सीसीटीव्हीचा डीव्हीआर रियाजुद्दीन काजी त्यांनी ताब्यात घेतला तसंच गॅरेज चालक सावंत नावाच्या व्यक्तीला देखील चौकशी करता घेऊन गेले होते का मात्र या संदर्भातील कोणतीच माहिती त्यांनी मुंबई क्राईम ब्रांच या मुद्देमाल नोंदीत किंवा स्टेशन डायरीत नमूद केले नव्हते तपासात समोर आलेल्या माहितीनुसार याच बंटी गॅरेजमध्ये सचिन वाजे टीमने गाड्यांसाठी विविध प्रकारच्या बनावट नंबर प्लेट बनवल्या होत्या या गोष्टी कुठे तपासात समोर येऊ नये
याकरता पुरावे नष्ट केल्या जात होते यादरम्यान रियाजुद्दीन काजी हे विक्रोळी कन्नमवार नगर येथील बंटी नावाच्या गॅरेजमध्ये गेले होते आणि हा प्रकार जवळच असलेल्या विकास सीसीटीव्ही काही झाला होता तो आता तपास यंत्रणांच्या हाती लागला आहे यावरूनच रियाजुद्दीन काळजी यांची चौकशी देखील करण्यात आली होती कारण 25 फेब्रुवारीला कार मायकल रोडवर स्फोटकांनी भरलेली हिरव्या रंगाची गाडी सापडली होती त्यानंतर एकेक करून 26 आणि 27 फेब्रुवारी दरम्यान सचिन वाजे टीमने ठाण्यातील सचिन वाजे राहत असलेल्या साकेत कॉम्प्लेक्स इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज त्याचबरोबर ठाण्यातील सद्गुरू कार डेकोर या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तसाच दुकानातील सर्व रेकॉर्ड आणि विविध प्रकारचे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने ताब्यात घेतले होते आणि सर्व पुरावे त्यांनी मस्त देखील केल्याचे एन आय ए च्या तपासात समोर आलंय खरतर जसजसं सचिन वाजे यांनी केलेले धक्कादायक कारनामे तपासादरम्यान समोर येऊ लागल्यानंतर आपला आता काही खैर नाही तसंच या सर्व कटात आपण काय भूमिका बजावली आहे या सर्वांचे पुरावे तपास यंत्रणांच्या हाती लागलेत एवढंच नाही तर या संदर्भात एन आय एन ए रियाजुद्दीन काजी यांची तब्बल पाच दिवस रोज सलग दहा तास चौकशी देखील गेली आणि याच दरम्यान रियाजुद्दीन काझी ते माफीचे साक्षीदार बनणार असल्याची चर्चा समोर आली याबरोबरच तपास यंत्रणांच्या हाती एकेक करून जे धक्कादायक पुरावे हाती लागलेत या संदर्भांची माहिती रियाजुद्दीन काजी यांच्या चौकशीत देखील समोर आलंय त्यात आता पुरावे नष्ट करण्याचा रियाजुद्दीन काजी यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेमकं रियाजुद्दीन काजी यांनी किती पुरावे नष्ट केले आणि त्यात काय गुढ लपले होते याची देखील आता चर्चा होऊ लागलीये
