जनतेज न्युज

रिद्धी विनायक हॉस्पिटल व विनायका हॉस्पिटल येथील आज रोजीच्या कोविड रुग्णांच्या मृत्यू बाबत वस्तूस्थिती*

प्रतिनिधी , आज विनायका हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयामध्ये 07 व रिद्धी विनायक या खाजगी रुग्णालयामध्ये 03 रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजन अभावी झाला ही बातमी वस्तूस्थितीस अनुसरून नाही.
विनायक हॉस्पिटल या खाजगी कोविड रुग्णालयास लिओ ऑक्सिजन एजन्सी या ऑक्सिजन पुरवठादाराकडून काल दि.११/०४/२०२१ रोजी १३९ जम्बो सिलेंडर व १ Dura सिलेंडर (१ Dura सिलेंडर= ,२८ जम्बो सिलेंडर) असे १६६ जम्बो सिलेंडरचा पूरवठा करण्यात आला होता. एका जम्बो सिलेंडरमध्ये 7000लिटर ऑक्सिजन असून त्याप्रमाणे पुरेसा ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला होता, ही वस्तुस्थिती आहे.
रिद्धीविनायक हॉस्पिटल या खाजगी कोविड रुग्णालयास खाजगी ऑक्सिजन पुरवठादाराकडून काल दि.११/०४/२०२१ रोजी ५० जम्बो सिलेंडर व आज दि.१२/०४/२०२१ रोजी ६० असे एकूण ११० जम्बो ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा करण्यात आला होता.
वसई-विरार महानगरपालिका परिक्षेत्रात एकूण ८ खाजगी कोविड रुग्णालये असून अशाप्रकारे ऑक्सिजन अभावी कोविड रूग्णांचा मृत्यू झालेची बाब इतर कोणत्याही रुग्णालयात उद्भवलेली नाही. महानगपालिकेने स्वतः हुन पुढाकार घेऊन आज दि.१२/०४/२०२१रोजी १०टन ऑक्सिजन प्राप्त करून घेतला असून महानगरपालिकेची स्वतः ची २ व इतर खाजगी रुग्णालयांना पुरेसा ऑक्सिजन पुरवठा सुस्थितीत ठेवण्यात आलेला आहे.
त्यामुळे उपरोक्त २रुग्णालयांमधील अत्यावस्थ रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजन अभावी झालेला आहे, ही बाब वस्तूस्थितीस धरून नाही.