जनतेज न्युज

दुकानाच्या पाट्या मराठीत लावा अन्यथा कारवाई, कल्याण डोंबिवली महापालिकेचा इशारा

प्रथिनिधी, कल्याण :

दुकानावरील प्रमुख नामफलक म्हणजेच पाट्या मराठीत लावा अन्यथा कारवाईला सामोरे जावं लागेल असा इशारा कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने शहरातील दुकानाराना दिला आहे .याबाबत शासनाच्या आदेशानुसार पालिका आयुक्तांनी शहरातील दुकानदार , आस्थापना सूचना दिल्या आहेत .

राज्य सरकारने दुकानांवरील बोर्ड मराठीत असावेत असे निर्देश दिले होते. परंतु अद्यापही अनेक दुकानदारांनी इंग्लिशमध्ये पाट्या लावल्या आहेत. शासनाच्या आदेशाचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्याने कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेत लावण्यात यावेत असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे, आता महापालिका क्षेत्रातील सर्व दुकाने व आस्थापना यांना आपले नामफलक मराठी भाषेत लावणे बंधनकारक असणार आहे. याबाबत महापालिका क्षेत्रातील १० प्रभाग अधिकाऱ्यांना संबंधित प्रभागातील दुकाने आणि आस्थापनांना नामफलक मराठी भाषेत नाम फलक लावणेबाबत सूचना द्या. त्यानंतर देखील मराठी पाट्या लागल्या नाही तर, कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.