प्रथिनिधी, जळगाव : गेल्या दोन वर्ष कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे श्री क्षेत्र पंढरपूरला वारकऱ्यांना पायी जाता आले नाही परंतु दोन वर्षाच्या कालखंडानंतर पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जाण्याचा आनंद वारकऱ्यांचा चेहऱ्यावर दिसत होता चोपडा तालुक्यातील वेले या गावी विठ्ठल मंदिरापासून ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी ला ह भ प किशोरजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली आज पासून मार्गस्थ झाले यावेळी वेले गावातील ग्रामस्थांनी वारकऱ्यांच्या सेवेत मग्न झाले होते वारकरी 11महिने शेतीचे व घराच्या काम करीत असतो आणि एक महिना विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी दिंडीत व्यस्त असतो वेले गावापासून ते पंढरपूर पर्यंत 28 मुक्काम असणार आहे 28 व्या दिवशी पंढरपूरला पोहोचणार आहे या पायी दिंडीत जवळपास अडीचशे वारकरी असणार असल्याचे ह भ प किशोरजी महाराज सोनखेडी कर यांनी सांगितले या पायी दिंडीत जाणाऱ्या वारकऱ्यांना गेल्या दोन वर्षांच्या कालखंडानंतर विठ्ठलाची दर्शनाची ओढ लागली दिसत होती यावेळी ह भ प किशोर पाटील महाराज जगन्नाथ बाविस्कर व समस्त ह भ प वारकरी वेले गावातील ग्रामस्थ मंडळ हे उपस्थित होते.
