प्रतिनिधी, वर्धा : वर्धा जिल्ह्यातील समुद्रपुर तालुक्यातील गिरड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नव्याने रुजू झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनियमित व मनमानी कारभार कंटाळून माजी सरपंच विजय तडस सह रुग्णांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले. येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात महिन्यांभऱ्यापुर्वी प्रामाणिकपणे सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी डॉ मिलींद गुजर व डॉ मुन यांच्या जागी दोन नवीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मात्र हे दोन्ही वैद्यकीय अधिकारी आपला मनमानी कारभार करीत असुन वेळेवर रुग्णालयात येत नसल्याने याचा रोज याठिकाणी येत असलेल्या शेकडो ग्रामिण भागातील रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे.याला कंटाळून गिरडचे माजी उपसरपंच विजय तडस,मोहगांव ग्रामपंचायतीचे सरपंच विलास नवघरे,गिरडचे उपसरपंच मंगेश गिरडे यांच्यासह नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वार कुलूप लावून आधी असलेले दोन्ही डॉक्टरांची मागणी केली आहे.
