जनतेज न्युज

महागाई विरोधात येवला शहरात काँग्रेसचे आंदोलन

प्रतिनिधी, नाशिक :  देशात वाढलेली महागाई, पेट्रोल – डिझेलच्या वाढलेल्या किंमती, गॅसची झालेली दरवाढ, अग्निपथ योजना, जीवनावश्यक वस्तूवरील वाढवलेल्या जि.एस.टी विरूध्द येवला काँग्रेस कमिटीच्या वतीने निदर्शने करुन विंचूर चौपाली येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काँग्रेसच्या वतीने फुटाणे वाटप करत, चूल मांडून गॅस टाकी ठेवत आंदोलन करण्यात आले.