जनतेज न्युज

धुळे जिल्हा न्यायालयात लोक अदालतीचे आयोजन…

प्रतिनिधी , धुळे : हायकोर्टाने व सुप्रीम कोर्टाने निर्देशीत केल्यानंतर धुळ्यातील जिल्हा सत्र न्यायालय मध्ये आज राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते. लोक अदालतिच्या दरम्यान प्रलंबित असलेली 30,000 प्रकरणं ठेवण्यात आली होती.
या 30,000 पेंडिंग केसेस मध्ये कार्पोरेशन शी रिलेटेड केसेस त्याचबरोबर महावितरण, धुळे मनपा संदर्भातील केसेस व जिल्हा परिषदेच्या केसेसचा यामध्ये समावेश होता.
यापैकी साडेचार ते पाच हजार केसेस या समिट योग्य असल्याने या ठिकाणी या केसेस चा निकाल देताना डॉक्टर्स त्याचबरोबर समाजसेवक व वकील यांची मदत घेण्यात आली आहे.
लोक अदालतीच्या वेळी जिल्हास्तरीय सर्व वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. त्याचबरोबर या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने लोक अदालत आणखीनच ग्रँड सक्सेस होणार अशी आशा वरिष्ठ न्यायाधीशांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे.