प्रतिनिधी , धुळे : लोकशाहीर तथा थोर साहित्यिक म्हणून ओळखले जाणारे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरात लेनिन चौकात मातंग समाजाच्या समाज बांधवांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
गेल्या कित्येक वर्षांपासून धुळे शहरामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची मातंग समाजाच्या वतीने मागणी करण्यात येत आहे. परंतु धुळे पालिका प्रशासनाने अद्याप लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला नसल्याची खंत मातंग समाजाच्या बांधवांनी व्यक्त केली आहे.
पुढील वर्षापर्यंत लवकरात लवकर धुळे मनपा प्रशासनाने या संदर्भातील दखल घेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा धुळे शहरामध्ये उभारावा अशी मागणी यावेळी प्रशासनाला करण्यात आली आहे.
