जनतेज न्युज

प्रवाशांना भूलथापा देऊन लूटणा:या दोघांना सीसीटीव्हीच्या सहाय्याने अटक

प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : प्रवाशांना भूलथापा देऊन लूटणा:या दोन तरुणांना कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचने अटक केली आहे. आरोपी हे प्रवाशाला विद्याविहारला घेऊन गेले. त्याठिकाणी त्याला चाकूचा धाक दाखवत त्यांच्या जवळील रोकड आणि वस्तू घेऊन पसार झाले होते. सीसीटीव्हीच्या सहाय्याने दोघांना अवघ्या 18 तासाच अटक करण्यात आली आहे. नदीम शहा आणि मुकेश पिंपळीसकर अशी आरोपींची नावे आहेत.
शिवकुमार यादव हा तरुणाला बिहारला जायचे होते. तो ट्रेन पकडण्यासाठी शुक्रवारी साडे नऊ वाजताच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकात आला. कल्याण तिकीट बुकिंग ऑफिसजवळ उभा असताना शिवकुमारला दोन तरुण भेटले. त्यालाही ही चिंता होती की त्याला ट्रेन कशी मिळणार. हे दोघे तरुण शिवकुमारच्या जवळ आले. शिवकुमारला सांगितले की, तू आमच्या सोबत विद्याविहारला सोबत चल तिथून गाडीत बसायला जागा मिळेल. त्यानंतर गावी निघून जावू. यादव हा त्यांचे ऐकून विद्याविहारला गेला. त्याठिकाणी निजर्न स्थळी नेऊन यादव यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोकड आणि वस्तू घेऊन पसार झाले. या प्रकरणी कल्याण जीआरपीत यादव याने तक्रार दाखल केली होती. कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचने 18 तासाच्या आत सीसीटीव्हीच्या सहाय्याने दोन्ही आरोपींनी बेडय़ा ठोकल्या आहे. पोलिसांच्या माहितीनुसार हे दोन्ही सराहित गुन्हेगार असून या दोघांना नवपाडा येथून अटक केली