प्रतिनिधी , धुळे : धुळे तालुक्यातील मेहरगाव येथे गेल्या आठवड्यात 80 ते 85 कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या मृत झालेल्या कोंबड्यांचे नमुने भोपाळ येथील प्रयोग शाळेत पाठवण्यात आले होते. हे अहवाल काल रात्री उशिरा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून बर्ड फ्लू पॉझिटिव्ह असल्याचे यात निष्पन्न झाले आहे.
या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरगाव झाला असून तालुक्यातील मेहेरगाव येथील दोन पोल्ट्री फार्म धुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सील करण्यात आले असून, तसेच या परिसरातील एक किलोमीटरचा परिसर देखील बंद करण्यात आला आहे. जिल्ह्यात बर्ड फ्लू ची लागण वाढू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीने योग्य ती खबरदारी घेण्यात येत असून आज प्रांताधिकारी कार्यालयात तातडीची बैठक प्रांताधिकारी भीमराज दराडे यांच्या उपस्थितीत पार पडली. या कोंबड्यांची विल्हेवाट आज केले जाणार असल्याची माहिती भीमराज दराडे यांनी दिली.
