प्रतिनिधी , वाशिम : ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करण्यासाठी राज्यात महिला आर्थिक विकास महामंडळ राबविल्या जात असून,या माध्यमातून राज्यभरात लाखो महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे.मात्र ग्रामीण भागात महिलांना जागा उपलब्ध होत नसल्याने अडचणी येत आहेत. त्यामुळं सरकारने ग्रामीण भागात रिकाम्या असलेल्या सरकारी इमारती महिला बचत गटांना उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी सरकारला करणार असल्याचे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या राज्याध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी सांगितलं ते वाशिम जिल्ह्यात बचत गटांच्या मेळाव्या साठी आल्या असता पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
महिला आर्थिक विकास महामंडळाचा पश्चिम विदर्भ दौरा झाला असून,वाशिम या दौऱ्याची सांगता करण्यात आली. यावेळी वाशिम मधील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला रूअल मार्ट च्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध झाली असल्याने येथील बचत गट सक्षम असल्याचे यावेळी ज्योती ठाकरे यांनी बोलताना सांगितले…..
