जनतेज न्युज

धुळ्यात विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी सरस्वती यांनी हिंदू तरुणांना तलवार बाळगण्याचे केले वादग्रस्त आवाहन…

प्रतिनिधी , धुळे : धुळ्यात रामनवमी चा उत्साह मोठ्या जल्लोषात पार पडला, या रामनवमीच्या कार्यक्रमा निमित्त धुळे शहरातील प्राचीन राम मंदिराजवळ धर्म सभेचे आयोजन करण्यात आले होते, त्यात विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी सरस्वती यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.

या कार्यक्रमा दरम्यान साध्वी सरस्वती यांनी धुळेकरांना संबोधित करत असताना वादग्रस्त विधान केले आहे. कश्मीर फाईल या चित्रपटाच्या विषयाला अनुसरून “धुळ्यात देखील दुसऱ्या कश्मीर फाईल ची पुनरावृत्ती ना होवो यासाठी एक लाख रुपयाचा मोबाईल, लॅपटॉप हातात बाळगणाऱ्या हिंदू तरूणांनी एक हजार रुपयाची तलवार देखील हातात ठेवावी” अश्र-शस्त्र ठेवणे तर आपल्या हिंदूंची शान आहे. असे म्हणत साध्वी सरस्वती यांनी हिंदु तरुणांना तलवार हातात बाळगण्याचे खुले आवाहन या कार्यक्रमा दरम्यान केले. साध्वी सरस्वती यांच्या या वादग्रस्त विधानाचे कशा पद्धतीने पडसाद धुळे जिल्ह्यात उमटतात हे बघन देखील महत्वाच असणार आहे.