जनतेज न्युज

आमदार गिरीश महाजन यांनी धरला रामनवमीच्या मिरवणुकीत डीजेच्या तालावर ठेका

प्रतिनिधी ,जळगाव : जामनेरात मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम नवमी निमित्त जामनेर शहरात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला ,त्याचबरोबर गणेश वाडी मित्र मंडळातर्फे श्रीराम जन्मोत्सव निमित्त भव्य रॅली काढण्यात आली यावेळी प्रतिमापूजन माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार गिरीश महाजन यांनी डीजेच्या तालावर मिरवणुकीत ठेका धरला. यावेळी जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील नगरसेवक महेंद्र बाविस्कर सुहास पाटील यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. जामनेर शहरांमध्ये श्रीराम नवमी निमित्त सर्व शहर माझ्यामध्ये चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले सकाळी बारा वाजता श्रीराम पेठ मधील श्रीराम मंदिरामध्ये श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष कचरूलाल बहरा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते सायंकाळी सहा वाजता गणेश वाडी मित्रमंडळातर्फे श्रीराम यांच्या मूर्तीचे प्रतिमा पूजन आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी परसावर श्रीराम लक्ष्मण सीता व हनुमान यांचे सजीव व आरास मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक गणेश वाडी गांधी चौक नगरपालिका चौक मार्ग काढण्यात आली यावेळी शहरातील मोठ्या संख्येने नागरिक व महिला मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी जामनेर पोलिसांनी चोख बंदोबस्त राखला.